पोलिस म्हटले की आपल्या कल्पनेत असणारी प्रतिमा ही बऱ्याच वेळा नकारात्मक असते. परंतु ही प्रतिमा आपल्या स्वानुभावापेक्षा सिनेमा, सिरियल, वर्तमानपत्रे या सर्व मिडिया जगतातून तयार झालेली असते. आज मुक्तांगण मध्ये डी. सी. पी. मनोज पाटील रुग्ण मित्रांशी गप्पा मारण्यासाठी आले होते. ही मुलाखत ऐकताना असे जाणवले की समाजात पोलिसांविषयी किती चुकीचा uसमज आहे. डी. सी. पी. सरांनी सांगितलेली एक गोष्ट मनापासून पटली, ते म्हणाले समाजात प्रत्येक क्षेत्रात चांगली आणि वाईट माणसं असतात. त्याचप्रमाणे पोलिस क्षेत्रातही असतात. पण त्यामुळे पूर्ण पोलिस खाते वाईट असं म्हणून कसं चालेल ?
अगदी योग्य आहे त्यांचे म्हणणे. समाजात बरीचशी माणसं काठावर बसून कसं पोहायच याचे धडे देतात. पण धाडस करून उडी मारणारे फारच कमी असतात.
डी. सी. पी. सरांनी त्यांच्या विभागात सुरू केलेला एक नविन उपक्रम "निर्भय विद्यार्थी अभियान" या विषयी माहिती दिली. आज त्यांच्या विभागात असलेल्या बहुतांश N. G. O. आणि शाळा या निर्भय विद्यार्थी अभियानात सहभागी झाले आहेत. या अभियानात मुला-मुलीँना समाजात त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे साहस मिळते. बहुतांश तक्रार केलेल्या प्रकरणात कार्यवाही केली जाते. आणि विशेष म्हणजे तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाते.त्यामुळे तक्रार करणाऱ्याला भिती नसते.
आज ही मुलाखत ऐकून असे वाटले की सर्व प्रकारच्या मिडियाने पोलिस क्षेत्राबद्दल शक्य तेवढ्या सकारात्मक गोष्टी लिहायला आणि दाखवायला पाहिजेत. जेणे करून समाजात पोलिसांबाबत विश्वास निर्माण होईल. त्याचा फायदा आपल्या समाजालाच होणार आहे.
डी. सी. पी. मनोज पाटील यांच्यासारखे अजूनही बरेच पोलिस अधिकारी असतील जे वेगवेगळे आभिनव प्रयोग करून समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न करत असतील. आपण नागरिकांनी त्यांना
जमेल तेवढे व जमेल तसे सहकार्य करणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा