आपण अनेक अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमांबद्दल ऐकतो, वाचतो, कधी कधी प्रत्यक्ष बघायला जातो, त्यांना देणगी देतो. एवढाच काय तो आपला या सगळ्यांशी संबंध.
माझ्या समुपदेशन कोर्सचा एक भाग म्हणून आम्ही सर्व विद्यार्थिनी विजय फळणीकरांचा "आपल घर" हा आश्रम बघायाला गेलो. मी फक्त आश्रम अस एवढ्यासाठी म्हटलं कारण इथे वृद्ध माणसे आणि लहान मुले एकत्र राहतात. म्हणजे हा अनाथ बालवृद्धाश्रम आहे.
"आपलं घर" या नावातच आपुलकी आहे. तिथे गेल्यावर या आपलेपणाचा अनुभव सुद्धा आला. आपण स्वतःच घर जशा प्रकारे छान आणि नीटनेटके ठेवतो, शिवाय आपल्या घरातले सदस्य जसे एकमेकांशी वागतो, एकमेकांची काळजी घेतो, अगदी त्याच प्रकारे सगळं इथे बघायला मिळत.
फळणीकरांचे "आपलं घर" बघून आल्यावर फारच भारावून गेल्यासारखं वाटत, पण त्याहीपेक्षा जास्त परिणाम होतो तो त्यांचं पुस्तक 'पराजय नव्हे विजय' हे वाचल्यानंतर. यात फळणीकरांच्या बालपणापासून ते त्यांच्या आत्तापर्यंतचा प्रवास त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे मांडला आहे. लहानपणापासून अनेक संकटांना समोर जात जात अतिशय धाडसी वृत्तीने आणि सकारात्मक विचारसरणीने फळणीकर अनेक दिव्यांतून गेले आहेत. पण या सगळ्या दिव्यांतून जात असताना त्यांनी त्यांची संवेदनशीलता आणि सदसद्विवेकबुद्धी कायम ठेवली.
फळणीकर दाम्पत्यावर झालेला सगळ्यात मोठा आघात म्हणजे त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे वैभव चे निधन. या आघाताने खचून गेलेल्या फळणीकरांनी यामधून बाहेर पाडण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबिला. "वैभव ट्रस्ट" ची स्थापना करून लोकसेवेसाठी त्यांनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी एका रुग्णवाहिकेची सेवा सुरु केली. ही रुग्णवाहिका चालविण्यासाठी त्यांनी एक ड्राइवर ठेवला परंतु तो फक्त दिवसा काम करीत असे. मग जेव्हा जेव्हा रात्री बेरात्री रुग्णवाहिकेची गरज भासत असे तेव्हा फळणीकर स्वतः ती रुग्णवाहिका घेऊन जात असत. त्यावेळी त्यांना आलेले चित्तथरारक अनुभव वाचून आपण सुन्न होतो.
त्यानंतर "आपलं घर" सुरु करत असताना त्यांना आलेल्या अडचणी त्यावर त्यांनी शोधलेले उपाय आणि त्याचप्रमाणे काही हितचिंतकांनी त्यांना सढळ हस्ते केलेली मदत ही सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकात नमूद केलेली आहे.
"आपलं घर" ची बांधणी खरच खूप छान आहे. वारजे इथे असलेला त्यांचा आश्रम हा फक्त मुलांसाठी आहे. आणि डोणजे (सिंहगड पायथा) येथे असलेली जागा बऱ्यापैकी विस्तारित आहे. येथे 10 आजी आजोबा आणि 35 मुलं मुली एकत्र राहतात. आपलं घर ही संस्था ज्या आजी आजोबांना किंवा मुलांना जवळचे असे कोणीच नाही अशांसाठी आहे. इथे राहणारे सर्व गरजू हे विनामूल्य राहतात. पण वैशिष्ट्य असे की तरीही इथले राहणीमान हे अतिशय उत्तम आहे. येथील स्वच्छता तर वाखाणण्याजोगी आहे. फळणीकर म्हणतात 'हे विनामूल्य इथे राहतात म्हणून त्यांना आपल्याला कुठेतरी आणून टाकले आहे असे वाटता काम नये याची मी पूर्ण काळजी घेतो'. येथील आजी आजोबांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की या लहान मुलांमुळे आम्हाला नातवंडांचं प्रेम मिळत. आम्ही त्यांची शक्य तेवढी काळजी घेतो त्याचप्रमाणे ही मुलं देखील आमची काळजी घेतात आणि आमची करमणूक करतात. आपलं घर मधील प्रत्येक मुलगा / मुलगी शाळेत जातात. या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा फळणीकरांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मोठी मुलं लहान मुलांना अभ्यासात मदत करतात.
आम्ही आपलं घर बघायला गेलो तो शनिवार होता, तेथील मंडळींकडून अस समजलं कि फळणीकर फक्त रविवारी येतात. परंतु योगायोगाने काही कामानिमित्त ते डोणज्याला आले आणि आम्ही त्यांना भेटू शकलो. अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी व्यक्तिमत्व!! त्यांच्या सांगण्यावरून त्यांचा सगळा कर्मचारी वर्ग आपलं घर ची व्यवस्था उत्तम प्रकारे बघतात. आणि ते स्वतः संस्थेसाठी देणगी मिळावी या हेतूने वेगवेगळ्या लोकांच्या भेटीसाठी फिरत असतात आणि रविवारी मात्र या त्यांच्या परिवारासोबत वेळ घालविण्यासाठी नक्की डोणज्याला येतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर " मी आणि माझी झोळी असे आम्ही आठवडाभर फिरत असतो आणि रविवारी या सर्वांसोबत वेळ घालवायला इथे येतो'.
एवढ मोठं सामाजिक काम करणाऱ्या माणसाच्या स्वभावातील नम्रता आणि साधेपणा बघून खरोखरच कौतुक वाटत. आजपर्यंत फळणीकरांना त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु मला अस वाटत आपलं घर येथील अबलवृद्धांकडून मिळणारे आशीर्वाद आणि मुलांकडून मिळणार भरघोस प्रेम हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.
विजय फळणीकरांप्रमाणेच त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या, तसेच स्वतःच्या मुलाच्या निधनाच्या दुःखाच ओझं बाळगत असताना या अनाथ मुलांवर मनापासून प्रेम करणाऱ्या साधनाताईंविषयी देखील मनापासून अभिमान वाटतो!!